पोस्ट्स

तुमची आयुर्वेदिक टूथपेस्ट किती प्रभावी?

इमेज
source  आज कालच्या काळात आपला कल आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स वर जास्त आहे.  कोणतीही गोष्ट आयुर्वेदिक किंवा नैसगिक म्हटली की ती वापरण्यास 'सुरक्षित ' किंवा 'केमिकल रहित ' आहे असा आपला समज असतो.  आज बाजारात विविध आयुर्वेदिक टूथपेस्ट मिळत आहेत आणि त्याचा खप नेहमीच्या टूथपेस्ट पेक्षा कमी अधिक आहे.  परंतु, ती गोष्ट मग ती चेहऱ्याला लावायची कोणती क्रीम असो  किंवा दातांना साफ करण्यासाठी वापरात येणारी टूथपेस्ट ..एखादे प्रॉडक्ट खरोखरच आयुर्वेदिक आहे कि नाही , किंवा खरोखर ते प्रॉडक्ट त्याला अपेक्षित असलेले  काम बरोबर करत आहे कि नाही हे ओळखणं पण तितकच महत्वाचं असत.  बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्याला FDA प्रमाणपत्र मिळालेल असत त्या वापरण्यासाठी सुरक्षित  मानल्या जातात . जरी त्यात केमिकल असले तरी आवश्यक ते पदार्थ प्रमाणात असणे आवश्यक असते.  आपल्या सगळ्यांच्याच मनात ही  शंका असते कि मी अमुक अमुक कंपनीचं आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरावे, की नुसते सामान्य टूथपेस्ट वापरणे जास्त चांगले?  आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये बहुत्यांदा निंब, लवंग तेल, वैविदांग, बकुल, मध, आवळा, डाळिंब, त्रिफळा, अननस, पपई, पु

दात सफेद करण्यासाठी खरोखर बेकिंग सोडा वापरू शकतो ?

इमेज
sources  आपण दांत सफेद करण्यासाठी खरंच किती नवीन नवीन गोष्टी वापरून बघतो, नाही का..? कधी ऑइल पुल्लिंग कधी व्हाईटनिंग टूथपेस्ट , कधी व्हिनेगर आणि इंटरनेट वर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो  बेकिंग सोडा !  सगळ्यात पहिल्यांदा दांत सफेद करण्यासाठी सांगितले जाणाऱ्या पर्यायांमध्ये बेकिंग सोडा किंवा मीठ हे पदार्थ असतातचं ! काय आहे हा बेकिंग सोडा आणि खरोखरच ह्याने आपले दांत सफेद होतात का ... चला पाहू... बेकिंग सोडा म्हणजे काय? बेकिंग सोडा कुठे वापरला जातो हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे ... बेकिंग सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट हे एक रासायनिक कंपाऊंड असते जे पांढरे, स्फटिकासारखे असते आणि बर्‍याचदा बारीक पावडर स्वरूपात असते . हे सोडियम आणि बायकार्बोनेट आयनपासून बनलेले असते. . हे स्वभावात अल्कधर्मी असते  म्हणूनच ते आपल्या तोंडातील आम्लीय वातावरण निष्प्रभावी करण्यास मदत करते. हे खरोखर माझे दात पांढरे करू शकते? source  बेकिंग सोडा एक सौम्य अपघर्षक पदार्थ (abrasive agent) आहे, तो आपल्या दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकते. हे केवळ प्लाक, चहा किंवा कॉफीचे डाग

दांत सफेद करून घेण्याचे पांच उपाय ...

इमेज
source  सफेद निरोगी हास्य कुणाला नको असते , ते आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवायला ,चांगलं दिसायला मदत करते. तुमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने एकदा तरी आपले दांत सफेद दिसण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेले विविध उपाय अवलंबले असतील किंबहुना आपल्या दंतचिकित्सकालाही त्यासंबंधित विचारलं असावं जेव्हा या लेखात मी दात सफेद करण्याविषयी बोलत आहे तेव्हा असे समजू नका कि मी काही तुम्हाला दांत सफेद करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहे .. नाही ! जेव्हा पण आपण घरगुती उपायांबद्दल पहातो तेव्हा त्याला काही पुरावा नसतो, उलट बेकिंग सोडा किंवा लिंबू असे प्रकारचे पदार्थ तुमचे दांत सफेद करण्यापेक्षा तुमच्या दातांचे नुकसान करण्याला जास्त कारणीभूत ठरतात. मग हे बाकीचे प्रभावी उपाय कोणते ? १. डेंटल क्लिनिंग source  डेंटिस्ट कडून दांत स्वच्छ करून घेण्याला डेंटल क्लिनिंग किंवा डेंटल स्केलिंग  (oral prophylaxis) असे बोलले जाते . ज्यामुळे आपल्या दाताच्या पृष्ठभागावरील डाग (plaque) स्वच्छ व्हायला मदत होते. स्केलिंग नंतर पॉलिशिंग केल्यामुळे दाताचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो आणि अशा पृष्ठभागावर डाग साचत नाहीत .

कोरोनाच्या काळात तुमच्या डेंटिस्टला भेट देताय ? काय खबरदारी घ्याल..

इमेज
source  कोरोना विषाणूची साथ यामुळे भविष्यातील अनिश्चितता आणि अनिश्चिततेसह सर्व जगावर आर्थिक,सामाजिक आणि मानसिक पातळीवर परिणाम होताना दिसत आहेत. भारतामध्ये अनलॉक करायची प्रक्रिया सुरु झाल्यापासून,देशात विशेषतः शहरी भागात  कोरोनाचा संसर्ग आणखीच वाढत चाललेला आहे.इतक्या दिवसांपासून राज्यात खूप काही बंद होते त्यामध्ये ' दातांचे दवाखाने ' ही! आता डेंटिस्टनीही आप-आपले दवाखाने चालू करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपला दांत दुखत असेल किंवा काही त्रास झाला तर आपण डेंटिस्टला सहजपणे भेट देत असू पण आतामात्र कॉरोनाच्या प्रादुर्भावानंतर ते पहिल्यासारखे शक्य होईल का?  ...  source  आपण उदाहरणार्थ श्री.पाटील यांचा विचार करूया. श्री.पाटील यांच्या दाढेमध्ये  एक पोकळी होती ,जी आता दुखू लागली, वेदना कमी करण्यासाठी स्वत:हुंन दांत दुखण्याचे औषधे घेतल्यानंतरही त्यांना बरे होत नसल्याने आता डेंटिस्ट कडे जाणे त्यांना गरजेचे झाले. कोरोना महामारीच्या काळात डेंटिस्ट कडे जाण्याअगोदर त्यांना काही शंका आहेत ...  कोरोनाच्या काळात दंतचिकित्सकांना भेट देणे त्यांच्यासाठी  सुरक्षित आहे

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

इमेज
source  हा लेख वाचायला आलात म्हणजे तुम्ही कदाचित दांत काढून घेतला असेल किंवा काढायला जाणार असाल .. दांत काढण्याची कारणे बरीच असू शकतात , तुमचा दांत हलत असेल, जास्त किडला असू शकेल किंवा तुमच्या अक्कलदाढेला काढण्यासाठी तुमच्या डेंटिस्ट ने सल्ला दिला असेल... दांत काढण्याची प्रक्रिया झाल्यावर जी काही काळजी घ्यावयाची असते ते पूर्णपणे आपल्यावर असते.. आणि म्हणूनच दांत काढून झाल्यावर कोणती खबरदारी घ्यावी हे आपणास माहित असणे आवश्यक आहे. दांत काढून झाल्यानंतर तुमच्या दंतचिकित्सकाने तुम्हाला कमीतकमी अर्धा ते एक तासासाठी जखमेवर कापूस दाबून ठेवायला सांगितले असेल, जे दात काढल्यानंतर रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात मदत करेल. दात काढून झाल्यानंतर एक तासानंतर दही किंवा प्लेन आइस्क्रीम सारखे काहीतरी थंड खावे ज्यामुळे रक्तस्त्राव  कमी होण्यास मदत होते. काय काय करणे टाळावे ? दांत काढून झाल्यावर बाहेर थुंकणे किंवा पाण्याने चूळ भरणे टाळावे.  कमीतकमी २४ तासांसाठी कडक ,गरम आणि मसालेदार अन्नपदार्थ  आणि पेय टाळा. दांत काढलेल्या दिवशी ब्रश करू नका .  धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन टाळा कारण या

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

इमेज
source  तुम्ही हे वाचताय म्हणजे तुम्ही दांत काढून घेतलात किंवा घेणार ही असाल ! अर्थात मी तुम्हाला काही 'मिसळ पावा'वर ताव मारायला सांगणार नाही ना ही लगेच तुम्ही धाडस करून 'वडा पाव' खायला जाणार आहात  ..🙊 ठीक आहे ,अजून चवदार गोष्टींची नावं नको घ्यायला ... कारण जर तुम्ही खरंच दांत काढून घेताय किंवा काढायला जाणार आहेत तर तुम्हाला काही दिवस डाळ भातावरच काढावे लागू शकतात. SOURCE  बरं आपण दांत काढून झाल्यावर सात दिवस काय खाऊ शकता याबद्दल बोलण्यापूर्वी, दात काढण्याच्या दिवशी काय काय खाऊ नये याबद्दल चर्चा करूयात.. दांत काढून झाल्यावर त्या दिवशी : मसालेदार,कठीण आणि गरम खाद्यपदार्थ खाणे टाळावे  .. पॉपकॉर्न किंवा पापड  सारखे कुरकुरीत   पदार्थ टाळावेत बीज असलेले किंवा जीरा ,मोहरी ,तीळ असे पदार्थ खाणे टाळावे कारण हे सहसा जखमेमध्ये जाऊन बसतात आणि स्वच्छ होत नाही. ज्यामुळे यामुळे  पुढे जाऊन जखमेमध्ये ते अडकून आणखीनच त्रास होऊ शकतो. विशेषतः चहाप्रेमींनी त्यांचा आवडता गरमागरम चहा पिणे टाळावे. चला तर आपण मुद्द्याचं बोलू . दात काढल्यानंतर काही दिवस आपण काय खाऊ

अक्कलदाढ काढण्याअगोदर विचारले जाणारे ६ प्रश्न !

इमेज
source  मित्रांनो , जर का तुम्ही तुमची अक्कलदाढ काढून घेणार असाल किंवा बहुतेक तुम्हाला तुमच्या डेंटिस्ट ने अक्कलदाढ काढून घ्यायचा सल्ला दिला असेल .. तर मग तुम्हाला यातले काही प्रश्न नक्कीच असतील ... अक्कलदांत काढण्याअगोदर विचारले जाणारे बहुतेक प्रश्न व त्यांची उत्तरे :  १. एकाच बैठकीत एकापेक्षा जास्त अक्कलदांत काढून घेणे ठीक आहे  काय? उत्तर: होय आपण एकाच दिवशी एकापेक्षा जास्त अक्कलदांत काढून घेऊ शकतो. २. अक्कलदांत काढण्याच्या प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल? उत्तर.हे पूर्णपणे त्या केसवर अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये 10 मिनिटे लागू शकतात किंवा काहींना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. ३. दात काढून टाकल्यानंतर मी सामान्यपणे खाऊ शकतो? उत्तर. दांत काढल्यानंतर तुम्ही त्या दिवशी पातळ पदार्थ खाणे गरजेचे असते . विशेषतः त्या दिवशी तुम्ही तिखट,गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही साधे जेवण घेऊ शकता. \ वाचा: दांत काढल्यास काय खावे काय खाऊ  नये.  ४. मी माझे दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करू शकतो ? दात काढण्यासाठीच्या  प्रक्रियेनंतर मी कामा